Tuesday, January 21, 2025

नव्या भूकंपाचे संकेत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

नव्या भूकंपाचे संकेत

जसे नाराजी नाट्याचे अंक,
पुन्हा सादर व्हायला लागले.
तसे राजकीय भूकंपाचे,
नवे संकेत यायला लागले.

नव्या राजकीय भूकंपाचे,
दाव्यावरती नवे दावे आहेत.
भूकंपाचे अंदाज म्हणजे,
कुणाचे राजकीय कावे आहेत.

जिकडे तिकडे पसरलेली,
राजकीय भूकंपाची कीर्ती आहे!
नव्या भूकंपाचा केंद्रबिंदू,
म्हणे जुन्याच जागेवरती आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8806
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 234 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 234 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1gxeaHvvrvaer4LbXz1...