आजची वात्रटिका
--------------------
राजकीय पातळी
राजकारणाची मान मर्यादा,
सगळ्यांकडूनच विसरली आहे.
जशी राजकारणाची पातळी घसरली,
तशी टीकेची पातळीही घसरली आहे.
आपल्या अचकट विचकट शब्दांनी,
त्यांचे थेट कमरेखालीच वार आहेत.
राजकारणाच्या घसरत्या पातळीचे,
सगळे सारखेच गुन्हेगार आहेत.
कालच्या घसरलेल्या पातळीवर,
रोज नव्याने कुणाची तरी मात आहे !
राजकारणाची घसरती पातळी,
रोजच्या रोज खाली खाली जात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8799
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14 जानेवारी 2025
No comments:
Post a Comment