Wednesday, January 22, 2025

भ्रष्टाचार आणि मान्यता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

भ्रष्टाचार आणि मान्यता

जशी भ्रष्टाचाराशिवाय योजना नाही,
तसा योजनेशिवाय भ्रष्टाचार नाही.
भ्रष्टाचाराच्या व्यापकतेचे,
याच्यासारखे कोणतेच सार नाही.

मान्य असो वा अमान्य,
भ्रष्टाचार आज लोकमान्य आहे.
जो देत नाही आणि खात नाही,
त्याची तर खरोखरच धन्य आहे.

लोकमान्यताआणि सरकारमान्यता,
हेच भ्रष्टाचाराचे खरे टॉनिक आहे !
तेरी भी चुप मेरी भी चुप,
भ्रष्टाचार म्हणजे झाकले माणिक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8807
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22जानेवारी 2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...