Friday, January 24, 2025

चेक रियालिटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
चेक रियालिटी
पक्षीय चिरफाड करूनसुद्धा,
नव्या ऑपरेशनची वार्ता आहे.
जो काल सुत्रधार होता,
तोच पुन्हा कर्ता धर्ता आहे.
फोडा आणि राज्य करा,
हा तर इंग्रजांचा फंडा आहे
लोकशाहीच्या मार्गानेच,
हा लोकशाहीला गंडा आहे.
फोडा आणि राज्य करा,
या दरवेळीच नवी मेख आहे !
जुन्या राजकीय मित्रांना,
नव्या मित्रांकडून चेक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8809
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24जानेवारी 2025

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...