Saturday, January 4, 2025

वन डे चे फंडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

वन डे चे फंडे

जयंत्या - पुण्यतिथी म्हणजे,
वन डे मॅच खेळून होतात.
हार तुरे गुलाल वगैरे..
एक दिवस माळून होतात.

एकदा वन डे संपला की,
हार तुरे सुकले जातात.
काल केलेल्या जागराला,
स्वतःच मुकले जातात.

महापुरुषांना उजवले पाहिजे,
महापुरुषांना रुजवले पाहिजे !
फक्त वन डे मॅच न खेळता,
स्वतःला थोडे झिजवले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8789
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
4जानेवारी 2025
 

No comments:

daily vatratika...29jane2026