Saturday, January 18, 2025

फसवा फसवी ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

फसवा फसवी

आपणच खरे असल्याचा,
जो तो जोरात ठसवतो आहे.
ज्याला त्याला माहिती असते,
आपण लोकांना फसवतो आहे.

फसायला आणि फसवायला,
हल्ली सगळ्यांनाच आवडते आहे.
फसवाफसवीच्या खेळाचा मार्ग,
अगदी आवडीने निवडते आहे.

त्यामुळेच जिकडे बघावे तिकडे,
आज फसवे एके फसवे आहेत !
तेरी भी चूप मेरी भी चुप,
सगळेच बाजार बसवे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8803
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 234 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 234 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1gxeaHvvrvaer4LbXz1...