Monday, January 20, 2025

बंदुक्या - पिस्तुल्याचा संवाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बंदुक्या - पिस्तुल्याचा संवाद

बंदुक्या म्हणाला पिस्तुल्याला,
आता मात्र खरोखरच हद्द आहे.
तुझ्याबरोबर माझा सुद्धा,
सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे.

गावठी कट्ट्याचा घोडेबाजार,
चोरून लपून तेजीत आहे.
वाढदिवसाचे केक कापण्यासाठी,
कुणी तलवारीला पाणी पाजीत आहे.

आपली दहशत माजविण्यासाठीच,
शस्त्र परवान्याचे रिवाज आहेत !
ढीशक्याव.....ढीशक्याव...असे,
सोशल मीडियावर आवाज आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8805
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 234 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 234 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1gxeaHvvrvaer4LbXz1...