Wednesday, January 1, 2025

आँखो देखा हाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

आँखो देखा हाल...

कायद्यासारख्या कायद्यावर,
चित्रपटासारखी वेळ आहे.
चॅनलच्या पडद्या-पडद्यावरती,
कायद्याचचाच पोरखेळ आहे.

हे सांगायची गरजच नाही,
हे का आणि कसे होते आहे?
अगदी कायदेशीर मार्गानेच,
कायद्याचेच हसू होते आहे.

कायद्याचे अपहरण होऊन,
त्याचा मुडदा पडता कामा नये !
कायद्याच्या राज्यावरचा,
लोकविश्वास उडता कामा नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8786
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
1 जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...