Thursday, January 9, 2025

बदलता पवित्रा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बदलता पवित्रा

राजकारणाचे खरेखुरे रंग,
तेव्हाच कळायला लागतात.
जेव्हा फ्रंट फुटवर खेळणारे,
बॅक फुटवर खेळायला लागतात.

काल लावले चौकार-षटकार,
आज टिकी टिकी खेळावे लागते.
जेवढा चेंडूसुद्धा वळत नाही,
त्याहूनही जास्त वळावे लागते.

ज्यांनीनी गायली बंडाची गाणी,
त्यांना एकतेचे गीत गावे लागते !
कधी पडते हिट विकेट,
कधी रिटायर हर्ट व्हावे लागते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8794
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...