आजची वात्रटिका
--------------------
पक्षनिधी
कधी लपून छपून तर,
कधी उघड उघड लुटले जाते
वसुली केलेल्या खंडणीला,
हल्ली पक्षनिधी म्हटले जाते.
जसा पक्षनिधी वाटला जातो,
तसा पक्षनिधी लाटला जातो.
बॉण्डवर लिहून देऊ का?
पक्षनिधी कसा वटला जातो.
कुणाचा निधी दुर्लक्षित,
कुणाचा मात्र लक्षवेधी असतो !
कायदेशीर आणि बेकायदेशीर,
पक्षनिधीचा विधी असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8802
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17जानेवारी 2025
No comments:
Post a Comment