Friday, January 10, 2025

उडत्या तबकड्या..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

उडत्या तबकड्या

कुठे व्ह्यूअर्स मिलियन आहेत,
कुठे व्ह्यूअर्स बिलियन आहेत,
सोशल मीडियावर जिकडेतिकडे,
फक्त एलियन एके एलियन आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या,
सौजन्याने ह्या गोष्टी घडू लागल्या.
नववर्षाचे निमित्त साधून,
उडत्या तबकड्या उडू लागल्या.

कुठे एलियन हवेतून तर,
कुठे एलियन पाताळातून येत आहेत !
ज्याला जसा पाहिजे तसा,
एलियन्सचा अनुभव घेत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8795
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 227वा l पाने -48

दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 227वा l पाने -48 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1dlNutCsFbDhrqxtEkzk...