Thursday, January 2, 2025
शरणागती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका--------------------
शरणागती
गोरगरीब आणि सज्जन,
फक्त यांचेच इथे मरण आहे.
बळी तोच कानपिळी,
त्यालाच कायदाही शरण आहे.
कायद्याचा आदर करून सांगतो,
आहे हीच खरी फॅक्ट आहे.
गोरगरीब आणि सज्जनांसाठीच,
इथला कायदा रौलेट ॲक्ट आहे.
आजच्या कायदा आणि न्यायाचे,
कटू असले तरी काळे सत्य आहे !
इंग्रज आणि रझाकार बरे होते,
लोकांच्या बोलण्यात तथ्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8787
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
2जानेवारी 2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 6जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 218 वा l पाने -48
दैनिक वात्रटिका l 6जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 218 वा l पाने -48 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1ZJ0FnDGKf4EQdhAY43E...
-
दैनिक वात्रटिका l 1जुलै2024 वर्ष- चौथे अंक -31वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1uyJXscqR7q8dBq9dK8bUAZB9r5...
No comments:
Post a Comment