Tuesday, January 7, 2025

नैतिक जबाबदारीचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

नैतिक जबाबदारीचे वास्तव

नैतिक जबाबदारी ही गोष्ट,
कधीच इतिहास जमा झाली आहे.
एवढी सारी निगरगट्टता,
आज सगळीकडे आली आहे.

जी गोष्ट इतिहास जमा झाली,
तिला राजकारणात शोधू लागले.
आपापला राजकीय स्वार्थ,
सगळे मिळून साधू लागले.

ज्यांना जबाबदारीच कळत नाही,
त्यांच्याकडून नैतिकतेचा हट्ट आहे !
कपड्याच्या आत सगळेच नागडे,
ही म्हण इथे एकदम फिट्ट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8792
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
7 जानेवारी 2025
 

No comments:

daily vatratika...8jane2024