आजची वात्रटिका
--------------------
पालकमंत्री पद
पालकमंत्री पदाच्या शर्यतीचे,
प्रकार तसे एकदम रास्त आहेत,
त्याचे खरे कारण असे,
जिल्हे कमी; मंत्री जास्त आहेत.
कुणी कुणी एक सोडून,
दोन जिल्ह्यांचा मालक आहे.
आपल्या सोडून इतरांच्या,
जिल्ह्याचा कुणी पालक आहे.
कुणाची खुशी;कुणाची नाराजी,
प्रकार गृहीत धरावे लागतील !
सगळ्यांनाच खुश करण्यासाठी,
नवीन जिल्हे करावे लागतील !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8804
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19जानेवारी 2025
No comments:
Post a Comment