Sunday, January 5, 2025

ओवाळीते भाऊराया..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

ओवाळीते भाऊराया..

हिला गाळू नका, तिला टाळू नका,
एकमेकांची राजकीय कोंडी आहे.
सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी,
लाडक्या भावांची भांडा-भांडी आहे.

विरोधाला विरोध करता करता,
लाडक्या बहिणीला स्वीकारले आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
लाडक्या बहिणीचे स्वप्न साकारले आहे.

जसे धरले तर चावते आहे,
तसे सोडले तरी पळते आहे !
लाडक्या भावांचे राजकारण,
लाडक्या बहिणींनाही कळते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8790
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
5 जानेवारी 2025
 

No comments:

नैतिक जबाबदारीचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नैतिक जबाबदारीचे वास्तव नैतिक जबाबदारी ही गोष्ट, कधीच इतिहास जमा झाली आहे. एवढी सारी निगरगट्टता, आज सगळी...