Sunday, January 12, 2025

दो जिस्म मगर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

दो जिस्म मगर...

राजकारण आणि गुन्हेगारी,
परस्परांचे जन्मदाते आहेत.
कोण आई आहे?कोण बापआहे?
एवढे नात्यांमध्ये गोते आहेत.

काढायचे म्हटले तरी,
दोघांना वेगळे काढता येत नाही.
अगदी लढायचे म्हटले तरी,
दोघांना वेगळे लढता येत नाही.

दो जिस्म मगर एक जान है हम,
अशीच काहीशी अवस्था आहे !
परस्परांच्या सुख-सोयीसाठीच,
सगळी कायदेशीर व्यवस्था आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8797
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 227वा l पाने -48

दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 227वा l पाने -48 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1dlNutCsFbDhrqxtEkzk...