Friday, January 3, 2025

ज्याचा त्याचा अंदाज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

ज्याचा त्याचा अंदाज

कुणी म्हणतो मॅनेज झाले,
कुणी म्हणतो धमक्या आल्या.
कालच्या नगारे आणि ढोलांच्या,
आज अचानक टिमक्या झाल्या.

कुठेतरी आग लागल्याशिवाय,
आजूबाजूला पसरलेला धूर आहे ?
जसा त्यांचा बदलला पवित्रा,
तसा त्यांचा बदललेला सूर आहे.

कुणी म्हणतोय घातले शेपूट,
कुणी म्हणतोय सेटलमेंट आहे !
ज्याचे नाक जसे आहे,
त्याला अगदी तसाच सेंट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8788
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
3जानेवारी 2025 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...