Wednesday, January 8, 2025

वेडी आशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

वेडी आशा

जसा न्याय खरीदला जातो,
तसा न्याय विकला जातो.
न्याय मिळेल या आशेवरती,
न्यायसुद्धा टिकला जातो.

कितीही अन्याय झाला तरी,
पुन्हा न्यायाचीच आशा असते.
सगळ्या मर्यादा संपल्या तरी,
पुन्हा न्यायाची भाषा असते.

न्यायातसुद्धा अन्याय दडलेला,
हीच न्यायाची खुबी आहे !
न्यायाच्या विश्वासावरतीच,
आज न्यायव्यवस्था उभी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8793
वर्ष -25 वे
दैनिक झुंजार नेता
8 जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 8जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 220 वा l पाने -48

दैनिक वात्रटिका l 8जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 220 वा l पाने -48 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1_JzB2ctrQ3nXhmokg1y...