Monday, January 13, 2025

स्थानिक अडचण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

स्थानिक अडचण

महाविकास आघाडीत,
पुन्हा स्वबळाची भाषा आहे.
स्वबळाचे तीन तेरा वाजले,
तरीही स्वबळाचा धोशा आहे.

तिसरी आघाडी फुटली तरी,
घोषणा व्हायची बाकी आहे.
प्रत्येकाच्या हालचाली म्हणजे,
फुटीचीच तर झांकी आहे.

तिसऱ्या आघाडीच्या अवस्थेमुळे,
जो तो भलताच पॅनिक आहे !
राष्ट्रीय आणि प्रादेशिकतेपेक्षा,
खरी अडचण स्थानिक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8798
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13 जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 227वा l पाने -48

दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 227वा l पाने -48 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1dlNutCsFbDhrqxtEkzk...