Wednesday, January 29, 2025

राजीनामा मागणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

राजीनामा मागणी

राजीनामा मागणे सोपे,
राजीनामा देणे अवघड असते.
नैतिकता दाखविणे सोपे,
राजीनामा घेणे अवघड असतते.

सकारण आणि अकारण,
राजीनामा मागितला जातो.
स्वतः बरोबर इतरांचाही,
नैतिक संयम बघितला जातो.

राजीनामा देण्या घेण्यावरून,
राजकीय खळबळ माजलेली असते !
राजीनामा द्यायचा तरी कसा?
पदासाठी किंमत मोजलेली असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8813
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी 2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...