Showing posts with label आजची वात्रटिकाफेरफटका-7540 दैनिक झुंजार नेता. Show all posts
Showing posts with label आजची वात्रटिकाफेरफटका-7540 दैनिक झुंजार नेता. Show all posts

Thursday, November 27, 2025

राजकीय धडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

राजकीय धडा

त्यांच्या राजकीय लढाया,
आपल्यासाठी गंमतीचा भाग आहे.
पण वास्तव बघून कळते,
हा राजकीय हिंमतीचा भाग आहे.

सगळे काही उघड उघड,
त्यांच्यात काहीसुद्धा छुपे नाही.
राजकीय मित्रांविरुद्ध लढणे,
कुणासाठीसुद्धा मुळीच सोपे नाही.

ते जसे झुकून दाखवतात,
ते तसे वाकवून दाखवू शकतात !
ते एकमेकांनाच काय ?
जनतेलाही धडा शिकवू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9106
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27 नोव्हेंबर2025
 

Saturday, November 22, 2025

शहर विकास आघाड्या..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
शहर विकास आघाड्या
कुठे कुठे तिघाड्या आहेत,
कुठे कुठे बिघड्या आहेत.
शहर विकासाच्या नावाखाली,
कुठे कुठे आघाड्या आहेत.
आघाड्यांच्या नावाखाली,
शहरा शहराचा विकास आहे.
नको त्यांच्या गळ्यात गळे,
बाकी सगळेच झकास आहे.
आपल्याच पक्षीय प्रतिमेवर
आपल्या हाताने घाव आहे !
पक्षाऐवजी दुसऱ्याच,
निवडणूक चिन्हांना भाव आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9101
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22नोव्हेंबर2025

 

Sunday, March 7, 2021

अदला-बदली

आजची वात्रटिका
----------------------

अदला-बदली

शत्रुत्व आणि मित्रत्वाला,
राजकारणात स्थान नाही.
शत्रुत्व आणि मित्रत्वाची,
राजकारणात जाण नाही.

ज्याला जी वेळ साधायची,
त्याने ती वेळ साधली आहे !
म्हणूनच मित्राची आणि शत्रूची,
राजकीय अदला-बदली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7540
दैनिक झुंजार नेता
7मार्च2021

 

दैनिक वात्रटिका l 21ऑक्टोबर 2026वर्ष- सहावेअंक - 72वा l पाने -57

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...