आजची वात्रटिका
-------------------
कुठे कुठे तिघाड्या आहेत,
कुठे कुठे बिघड्या आहेत.
शहर विकासाच्या नावाखाली,
कुठे कुठे आघाड्या आहेत.
आघाड्यांच्या नावाखाली,
शहरा शहराचा विकास आहे.
नको त्यांच्या गळ्यात गळे,
बाकी सगळेच झकास आहे.
आपल्याच पक्षीय प्रतिमेवर
आपल्या हाताने घाव आहे !
पक्षाऐवजी दुसऱ्याच,
निवडणूक चिन्हांना भाव आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9101
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment