Friday, November 21, 2025

सामंजस्याचा करार

आजची वात्रटिका
----------------------------

सामंजस्याचा करार
विश्वास,ऐक्य आणि सुसंवाद,
जेव्हा एकाच वेळी फरार होतात.
त्या त्या वेळी त्यांच्यामध्ये,
नव्याने सामंजस्याचे करार होतात,
सामंजस्य करार करणारांमध्ये
जेवढ्या जेवढ्या फटी असतात !
त्याच्याहीपेक्षा दुप्पट तिप्पट,
सामंजस्य कराराच्या अटी असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 29
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
21 नोव्हेंबर 2025

 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...