Monday, November 17, 2025

इलेक्शन स्पेशल.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
इलेक्शन स्पेशल
कच्चा बच्चा कार्यकर्त्यांचे,
बघा लेंढारामागे लेंढार आहे.
उगीच बातम्या झळकतात,
खिंडारामागे खिंडार आहे.
मागून खिंडार,पुढून भरती,
अशी सर्वपक्षीय स्थिती आहे !
निष्ठा बिष्ठा सगळे काही,
दर निवडणुकीत सती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 25
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
17 नोव्हेंबर 2025

 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...