आजची वात्रटिका
----------------------------
घोटाळ्यांची कमाल
घोटाळ्यावर घोटाळे चाललेले,
सगळ्यांना घोटाळ्यांचे प्रेम आहे.
अनाधिकृत घोटाळे अधिकृत करा,
त्यासाठीही कायदेशीर फ्रेम आहे.
घोटाळे फ्रेममध्ये बसवले की,
घोटाळ्यांचे पाप धुवून काढले जाते!
नवा घोटाळा समोर आला की,
जुने प्रकरणही मागे पाडले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 18
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
8 नोव्हेंबर 2025
No comments:
Post a Comment