आजची वात्रटिका
-------------------
आचारसंहितेची अपेक्षा
लोकशाही आणि निवडणुकीतला,
आचारसंहिता हा दुवा असतो
सामान्य जनतेपुढे मात्र,
आचारसंहितेचा बागुलबुवा असतो.
आचारसंहितेची सगळी कलमे,
खुशाल पायदळी तुडवले जातात.
आचारसंहितेच्या सौजन्याने,
सामान्य लोक अडवले जातात.
ज्याने आचार संहिता पाळायला हवी,
त्याने कर्तव्य म्हणून पाळली पाहिजे !
आचारसंहिता कळते पण वळत नाही,
त्याला आचारसंहिता वळली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9084
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment