Sunday, November 2, 2025

टिकेची सर्कस..... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक वात्रटिका
----------------------------

टीकेची सर्कस

आपल्याच हाताने आपल्या, 
प्रतिमेवरती मोठा धोंडा आहे.
कुणी ठरला नागोबा तर,
कुणी म्हणे ॲनाकोंडा आहे.

टीका प्रतिटीका जेवढी जहरी,
तेवढीच ती तिरकस आहे
कुठे आरोपांचा कार्टून शो, 
कुठे आरोपांची सर्कस आहे.

जणू देशी पशुपक्षी कमी पडले, 
विदेशी प्राण्यांकडे धाव आहे!
पेंग्विन म्हणाला ॲनाकोंडाला, 
त्यामुळेच आपल्याला भाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 58
वर्ष- दुसरे
1 नोव्हेंबर 2025
----------------------------
माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 
https://suryakanti1.blogspot.com

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...