Tuesday, November 11, 2025

राजकीय गट्टी


आजची वात्रटिका 
----------------------------

राजकीय गट्टी

इकडून होते स्वागत तेंव्हा,
तिकडून जेंव्हा हकालपट्टी आहे. 
हकालपट्टी आणि स्वागताची, 
मोठी मजेशीर राजकीय गट्टी आहे.

बंडखोरी आणि हकालपट्टीवर, 
निष्ठेची अक्कल पाजळली जाते !
हकालपट्टी आणि स्वागतामुळेच,
राजकीय कारकिर्द उजळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 20
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
11 नोव्हेंबर 2025


 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...