Wednesday, November 19, 2025

चोरांचा दृष्टांत....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
चोरांचा दृष्टांत
चोर चोरांना समजावत म्हणाले,
आपण वाकडी वाट धरायची नाही.
निदान एकमेकांच्या घरात,
आपण आता चोरी करायची नाही.
चोराच्या उलट्या बोंबा असला प्रसंग,
उगीच आपल्या अंगावर ओढू नका !
झाले गेले गंगेला मिळाले,
आता एकमेकांच्या टोळ्या फोडू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 27
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
19 नोव्हेंबर 2025

 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...