Sunday, November 2, 2025

आई शपथ सांगा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आई शपथ सांगा

आज हेही बोंबले आहेत,
आज तेही बोंबले आहेत.
मग सगळी बोगस नावे,
सांगा कुणी कोंबले आहेत ?

काल ज्यांनी कोंबाकोंब केली,
त्यांचीच आज बोंबाबोंब आहे.
आम्ही खरे; तुम्हीच खोटे,
त्यांचीच आज झोंबाझोंब आहे.

सरळ सरळ थुका लावतात,
साक्षीला बोटावरची शाई आहे !
लोकशाही फक्त व्यवस्था नाही,
ती आपल्या सर्वांची आई आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9081
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 नोव्हेंबर2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...