Friday, November 14, 2025

बाल दिनाच्या निमित्ताने....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

बाल दिनाच्या निमित्ताने

त्यांचाही कुणीतरी विचार करा,
ज्यांचे कुणाचे वर्तन बालिश आहे.
त्यांच्या बालिशपणाचे कारण,
मेंदू कुणाकडे तरी ओलीस आहे.

वयाने कितीही वाढले तरी,
ज्यांची बुद्धी अजूनही बाल आहे.
रांगत्या बाळासारखे वाटतात,
कारण तशीच त्यांची चाल आहे.

तुमचा गैरसमज व्हायला नको,
आममच्याकडून खोटे आळ आहेत !
तुम्ही बारकाईने बघितले तर,
समजेल ते कुक्कुले बाळ आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9093
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14 नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...