आजची वात्रटिका
-------------------
फोटो जपून काढा
कुणासोबतही काढा,कसेही काढा,
पण त्याचाच होतो पुढे मोठा राडा.
त्यामुळेच सर्वांना विनंती आहे,
फोटो जपून काढा,फोटो जपून काढा.
काही फोटो देतात कबुली,
काही फोटो वाचतात पापाचा पाढा.
मागच्या पुढच्या विचार करून,
फोटो जपून काढा,फोटो जपून काढा.
काहींचा वापर,काहींचा गैरवापर,
ए. आय.ने तर नवाच वाढवला तिढा !
कुणीही बादरायण संबंध जोडतो म्हणून,
फोटो जपून काढा,फोटो जपून काढा !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9088
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment