Monday, November 3, 2025

नवा मोसम...नवा पक्ष....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

नवा मोसम...नवा पक्ष....

इकडून तिकडे ये जा करून,
सगळे उजळून घेऊ लागले.
परस्परांच्या पक्षांतरावरती,
अक्कल पाजळून घेऊ लागले.

जसे यांचे इकडे स्वागत आहे,
तसे त्यांचेही तिकडे स्वागत आहे.
सगळ्यांना जुन्याचे नवे व्हायला,
सांगा दुसरे काय लागत आहे ?

नवा मोसम....नवा पक्ष....
असेच प्रत्येकाचे ब्रीद वाक्य आहे !
राजकीय पक्षांच्या साट्या-लोट्यात,
कधीही आणि काहीही शक्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9082
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...