Thursday, November 6, 2025

ब्राझील मॉडेल ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

ब्राझील मॉडेल

सरस्वती,स्विटी,माधुरी?
कुणाला वाटेल चुडेल आहे.
इंडियाच्या रॅम्प वरती
चक्क 'ब्राझील मॉडेल' आहे.

एकीकडे आहे निशाणा,
मात्र दुसरीकडेच वार आहेत.
ब्राझील मॉडेलच्या जोडीला
डबल - टिबल स्टार आहेत.

कधी कधी वाटते खरे आहे,
कधी कधी वाटते फेक आहे !
तर्जनीवरच्या शाईचा,
अंगठ्याकडून रियालिटी चेक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9085
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...