Tuesday, November 18, 2025

अपघाती फायदे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

अपघाती फायदे

लव्ह मॅरेजवाल्यांना माहीत नव्हते,
उद्या कसले कसले कायदे होतील ?
आपण केलेल्या लव मॅरेजचे,
उद्या निवडणुकीतही फायदे होतील.

महिला आरक्षणाच्या निमित्ताने,
आजकाल सर्वत्र हेच तर घडत आहे.
नवरोबांच्या गळ्यातली माळ,
आज बायकांच्या गळ्यात पडत आहे.

पूर्वी समाजकारण ढवळले गेले होते,
आज राजकारण ढवळले जात आहे !
आंतरजातीय लव्ह मॅरेजमुळे,
आज राजकारण बावळले जात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9097
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18 नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...