Wednesday, November 12, 2025

सोयिस्कर चर्चा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सोयिस्कर चर्चा

त्यांना नको त्या चर्चा,
त्यांच्याकडून मारल्या जातात.
त्यांना पाहिजेत त्याच चर्चा,
त्यांच्याकडून पेरल्या जातात.

जशा चर्चा दडवल्या जातात,
तशा चर्चा घडवल्या जातात.
सोयीस्कर चर्चा घडवून,
आपल्या टिरर्या बडवल्या जातात.

सोयिस्कर चर्चांमधून,
सोयिस्कर सूर काढले जातात !
नको ते सूर दाबल्या जाऊन,
पाहिजे तेच सूर वाढले जातात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9091
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12 नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...