Saturday, November 1, 2025

वेटिंग गेम..... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
----------------------------

वेटिंग गेम

कुणाला वाटते बच्चू आहे,
कुणाला वाटते सच्चू आहे.
शेतकऱ्यांच्या विश्वासाला,
सरळ सरळ डच्चू आहे.

कुणाला वाटते तह आहे,
कुणाला वाटते संधी आहे !
कर्जमाफी आंदोलनांची,
काही महिने नसबंदी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 12
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
1नोव्हेंबर 2025
----------------------------
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण माझे 78 वात्रटिका संग्रह डाऊनलोड करू शकता.
https://vatratikaebooks.blogspot.com

- सूर्यकांत डोळसे

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...