Monday, November 10, 2025

आरोपांचा फियास्को

आजची वात्रटिका 

----------------------------

आरोपांचा फियास्को

पुराव्यांसह आणि पुराव्याशिवाय, 

आरोपांवर आरोप होत राहतात.

प्रिमिमिक्स आणि रिमिक्स अशा,

आरोपांच्या टेपवर टेप येत राहतात.


गाडी भरून आले, ट्रक भरून आले,

पुरावे कधीच साधे सुधे येत नाहीत !

चौकशीच्या फेऱ्यात पुरावे गाभाडताच, 

आरोप काही कधी सिद्ध होत नाहीत !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

   मोबाईल-9923847269

-------------------------------

आजची वात्रटिका - 19

वर्ष पहिले

दैनिक मराठवाडा नेता

10 नोव्हेंबर 2025

No comments:

राज्यसभेची तुतारी .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राज्यसभेची तुतारी विलीनीकरण होणार की नाही? प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे. त्यांच्या टारगेटव...