Monday, November 17, 2025

अतिक्रमण ....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

अतिक्रमण

हल्ली कुणालाच कळत नाही,
कुणाची कोणती वस्ती आहे?
शहरांपासून ते खेड्यापर्यंत,
फक्त बिबट्यांची धास्ती आहे.

कोण कुणाच्या धास्तीत आहे?
कोण कुणाच्या वस्तीत आहे ?
बिबट्या आणि माणूसही,
जणू आपल्याच मस्तीत आहे.

माणूस आणि बिबट्याचे अस्तित्व,
हल्ली परस्परांच्या जीवावर आहे!
बिबट्याच्या अधिवासाचा सातबारा,
हल्ली माणसाच्या नावावर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9096
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17 नोव्हेंबर2025
----------------------------
 

No comments:

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- घुसखोरी खोटे खोटे बोलत रहा, खरे बोलायचीही चोरी आहे. हल्ली जिकडे बघावे तिकडे, घुसखोरी एके घुसखोरी...