आजची वात्रटिका
-------------------------------
आश्वासने जिंदाबाद !
देणारा आणि घेणाऱ्यांची नावे,
जसे एक्स वाय झेड असतात.
तसे काही आश्वासने प्रीपेड,
काही मात्र पोस्टपेड असतात.
जनता लालची आहे म्हणूनच,
जनतेला लालूच दाखवली जाते !
जनता मिंधी आणि लाचार,
म्हणूनच जनता वाकवली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 32
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
26 नोव्हेंबर 2025
No comments:
Post a Comment