Monday, November 10, 2025

आरोप म्हणाले प्रत्यारोपांना ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आरोप म्हणाले प्रत्यारोपांना

सदा सर्वदा सुपरहिट ठरणारी,
आपल्या दोघांचीही जोडी आहे.
आपल्यावरती घसरायची,
सर्वच राजकारण्यांना गोडी आहे.

उचला जीभ,लावा टाळ्याला,
याच्यामध्ये जो तो टॉपर आहे.
विषयांतर आणि खळबळीसाठी,
आपल्या दोघांचाही वापर आहे.

आपण जसे जुळे भाऊ आहोत,
तसे राजकारणीही जुळे आहेत !
आपण कितीही झोंबलो तरी,
साक्षीला मिरच्याचे खळे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9089
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10 नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...