आजची वात्रटिका
-------------------
पॅटर्नची जन्मकथा
विजयाचे उद्दिष्ट समोर ठेवून,
ते वाटेल ते निर्णय घेऊ लागतात.
विनाशकाले विपरीत बुद्धी तरी,
नवे पॅटर्न जन्माला येऊ लागतात.
जेवढ्या त्यांच्या विसंगत तडजोडी,
तेवढे त्यांचे पॅटर्न गाजले जातात.
नव्या पॅटर्नमुळे जुन्या पॅटर्नचे,
पुन्हा पुन्हा बारा वाजले जातात.
सत्तेसाठी वाटेल ते.....
सत्तेसाठीच सगळे काही असते !
निवडणूक कोणतीही असो,
ती नव्या पॅटर्नची आई असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9092
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13 नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment