आजची वात्रटिका
---------------------------
लोकशाहीचा विजय झाला,
लोकशाहीची ही हार आहे.
टोकाच्या प्रतिक्रिया आल्या,
त्याचेच तर नाव बिहार आहे.
जे कुणी हरले आणि जिंकले,
त्यांचे अंदाजही चुकीचे आहेत !
उधार पाधार काहीच नाही,
सगळे व्यवहार रोखीचे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 24
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
15 नोव्हेंबर 2025

No comments:
Post a Comment