Wednesday, November 26, 2025

वैयक्तिक आचारसंहिता ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका
-------------------
वैयक्तिक आचारसंहिता
नको ती;नको तशी भाषा,
ज्याच्या त्याच्या तोंडी आहे.
मतदारांबरोबर आचारसंहितेची,
जिकडे तिकडे कोंडी आहे.
खर्चाच्या आकडेवारीचे,
आचारसंहितेकडून गणन आहे.
त्याची गणती कशी करायची?
जिथे चारित्र्याचेही हनन आहे?
जनाबरोबर मनाचीही,
आचारसंहिता आखली पाहिजे!
लोकशाहीच्या बळकटीसाठी तरी,
आचारसंहितेची बूज राखली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9105
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26 नोव्हेंबर2025

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...