आजची वात्रटिका
-------------------
दंडेलशाही
सत्याचा आणि नियमांचा,
तिथे तिथे अभाव असतो.
सत्याची होते पायमल्ली,
जिथे सत्तेचा प्रभाव असतो.
कुठे वापरले जाते नाव,
कुठे वापरलेला हुद्दा असतो.
जो मुद्द्यावर येईल त्याला,
दंडेलशाहीचा गुद्दा असतो.
एकदा दंडेलशाही वाढली की,
गंडेलशाहीही वाढू लागते !
जनतेच्या राज्याचे दिवास्वप्न,
लोकशाहीलाही पडू लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9086
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment