Saturday, November 8, 2025

कसोटीचे प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

कसोटीचे प्रसंग

असत्य सत्य म्हणून मिरवले जाते,
सत्य असत्य म्हणून मिरवले जाते.
आरोप प्रत्यारोपाच्या राड्यात,
धडधडीत सत्य मात्र हरवले जाते.

सत्याला आणि असत्यालासुद्धा,
पाठीराख्यांची उणीव भासत नाही.
जे पडले जाते एकटे,
त्याला मात्र कुणीही पुसत नाही.

असत्यावर सत्याचा मुलामा,
सत्यावर असत्याचा आळ असतो !
त्याचाच विजय ठरलेला,
ज्याच्या पाठीमागे काळ असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9087
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8 नोव्हेंबर2025
 

No comments:

राज्यसभेची तुतारी .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राज्यसभेची तुतारी विलीनीकरण होणार की नाही? प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे. त्यांच्या टारगेटव...