Tuesday, November 4, 2025

नवी भरारी,नवी झेप....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

-------------------

नवी भरारी,नवी झेप

पुरुषांच्या हातात वर्ल्ड कप आहे,
महिलांच्याही हातात वर्ल्ड कप आहे.
जागतिक क्रिकेट विश्वामध्ये,
भारताची नवी भरारी,नवी झेप आहे.

लेकांबरोबर लेकींचेही यश,
भारतमातेने पाहून घेतलेले आहे.
चौक्यांबरोबर छक्यांनीही...
सर्वांचेच मन मोहून घेतलेले आहे.

स्त्री पुरुष समानतेचा नवा अध्याय,
असे नाव तुम्ही याला देऊ शकतात !
उद्या कदाचित अधल्या मधल्यांच्याही,
वेगवेगळ्या स्पर्धा होऊ शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9083
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 नोव्हेंबर2025
 

No comments:

राजकीय गट्टी

आजची वात्रटिका  ---------------------------- राजकीय गट्टी इकडून होते स्वागत तेंव्हा, तिकडून जेंव्हा हकालपट्टी आहे.  हकालपट्टी आणि स्वागताची,...