Thursday, November 13, 2025

घोटाळ्यांचा वारसा.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
घोटाळ्यांचा वारसा
घोटाळे करणे सोपे असले तरी,
घोटाळे सिद्ध होणे अवघड आहे.
त्यांच्या घोटाळ्यातले घोटाळे,
लक्षामध्येही येणे अवघड आहे.
घोटाळे शोधणारापेक्षाही,
घोटाळेबहाद्दर महाज्ञानी आहेत !
घोटाळेबहाद्दर किरकोळ नाहीत,
घोटाळेबहाद्दर खानदानी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 22
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
13 नोव्हेंबर 2025

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...