आजची वात्रटिका
-------------------
कार्यकर्त्यांचे दुःख
निवडणूक कोणतीही असो,
ती कार्यकर्त्यांना दगा देऊन जाते.
जे जे कार्यकर्ते वेटिंग लिस्टवर,
त्यांना निवडणूक फुगा देऊन जाते.
आपल्या हातातला फुगा बघून,
कार्यकर्त्यांची हवा गुल होऊन जाते.
अनेक कटू अनुभव आले गेले,
तरीही पुन्हा जुनी भूल होऊन जाते.
चूक भूल देण्या घेण्याचा व्यवहार,
फक्त कार्यकर्त्यांच्या वाट्याला असतो !
कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत तर,
पुन्हा कार्यकर्ताच फाट्याला असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9104
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25नोव्हेंबर2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 4 जून 2026...वर्ष- सहावे ..अंक - 3 रा l पाने -54
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment