Friday, November 28, 2025

मतदार राजा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मतदार राजा

कधी मतदार राजाची मनधरणी,
कधी मात्र त्याला दम दिला जातो.
राजासारख्या राजाचा,
दरवेळी नवा गेम केला जातो.

राजा राजा म्हणीत मतदारराजाचा,
बरोबर बॅंड बाजा वाजवला जातो.
कोणतीही निवडणूक आली की,
मतदारराजा उजवला जातो.

आपल्या प्रासंगिक राजेपणाला,
मतदारराजाही भुलला जातो !
एकदा निवडणूक सरली की,
मतदारराजा अलगद कोलला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9107
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28 नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...